इंटरनेट गव्हर्नन्स फोरम (आयजीएफ), इंटरनेटशी संबंधित सार्वजनिक धोरणांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी सर्वांना सममूल्य मानणारी आणि विविध गटांतील प्रतिनिधींना एकत्र आणणारी एक मल्टी-स्टेकहोल्डर मंच आहे.
भारतातील लोकसंख्या 1.4 अब्जाहून अधिक असून त्यापैकी 1.2 अब्ज मोबाईल वापरकर्ते आणि 800 दशलक्ष इंटरनेट वापरकर्ते आहेत जे देशातील वाढती इंटरनेट संस्कृती प्रतिबिंबित करतात. विशेषतः वाढत्या सायबर स्पेससह भारतात ई-नियमन आणि राष्ट्रीय सुरक्षा हे अत्यंत महत्त्वाचे बनते.